मराठी कलाविश्वात गेल्या काही वर्षांपासून अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. ‘बलोच’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी ‘फौज’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘फौज’ चित्रपटात सीमेवर लढणाऱ्या मराठी रेजिंमेंटच्या सैनिकांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा : पत्नी उपासनाच्या वाढदिवसानिमित्त सुपरस्टार राम चरणने शेअर केला भावुक व्हिडीओ; म्हणाला, “आठ महिने सोपे होते त्यानंतर…”

मराठा सैन्याची सीमेवरील शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘फौज – द मराठा बटालियन’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २०२४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार करणार आहेत.

हेही वाचा : “कधी निर्भया, कधी मुंबई, आणि आता मणिपूर…”, प्रसिद्ध गायकाने मणिपूर घटनेवर व्यक्त केला संताप

‘फौज’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक दिसत आहेत. या शूरवीर मराठा रेजिमेंटमधील फौजींची विजयगाथा ‘फौज – द मराठा बटालियन’मधून पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीमने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये, “पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे ‘द मराठा बटालियन’ ज्यांचे नाव ऐकल्यानंतर देशाला अभिमान वाटतो आणि शत्रूंना भीती! अशा वीरांची मर्दुमकी फौज द मराठा बटालियन येणार २०२४ मध्ये!” असे म्हटले आहे.

हेही वाचा : “माझे मित्र आईला घाबरतात”, सोहमने सांगितला आई सुचित्रा बांदेकरचा किस्सा; म्हणाला, “कधीही न खाल्लेल्या पालेभाज्या…”

चित्रपटाविषयी सांगताना प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, “मराठा बटालियन ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. इंग्रजांच्या काळातही ती होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानले जाते. या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आतापर्यंत अनेकदा शौर्य दाखवले आहे. त्याच एका शौर्यकथेमधील गोष्ट आम्ही ‘फौज द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे मांडत आहोत.”