सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वत्र लगबग सुरु झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे. याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
रवी जाधव यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्या निमित्ताने त्याने जय्यत तयारी सुरु आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर यांचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “सुभेदारांच्या समाधीसमोर बसलो अन्…” अजय पूरकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा




“अनेक वर्षे झाली आम्ही घरातच बाप्पांची छोटीशी मुर्ती तयार करतो. या वर्षी त्यात एक छोटासा बदल केलाय. मुर्तीचा एक साचा ऑनलाईन मिळाला. त्यात शाडूची माती भरुन एक सुबक मुर्ती तयार झाली. आता त्यावर थोडे बारीक फाईन ट्युनिंग सुरु आहे. त्यानंतर रंगकाम. ते झाल्यावर नक्कीच शेअर करीन!!! गणपती बाप्पा मोरया”, असे रवी जाधव यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी
दरम्यान रवी जाधव हे सध्या ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सुश्मिता सेनने या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे.