Genelia Deshmukh Post For Indian Army : भारत व पाकिस्तान दरम्यानचा तणाव वाढतच आहे. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत या हल्ल्यांचा प्रयत्न उधळवून लावला. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये सीमेलगतच्या भागात ब्लॅकआउट करण्यात आला. या सर्व घडामोडींदरम्यान सेलिब्रिटी भारतीय सैन्याचं कौतुक करत आहेत. अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखने यासंदर्भात पोस्ट केल्या आहेत.

भारतीय सैन्यदलांनी ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव या एअर स्ट्राईकला देण्यात आलं. या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्याचबरोबर हल्ल्याचा प्रयत्नही करत आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर रितेश व जिनिलीया यांनी भारतीय सैन्यासाठी पोस्ट केल्या.

जिनिलीया देशमुखची पोस्ट –

“आपल्या भारतीय सैन्याला त्यांच्या शौर्य, धाडस आणि धैर्यासाठी सलाम. आम्ही आपल्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो. जय हिंद!” असं जिनिलीया देशमुखने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

genelia deshmukh post for indian army
जिनिलीया देशमुखची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

रितेश देशमुखची पोस्ट –

रितेशने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “खंबीरपणे उभे राहून, आपले रक्षण करणाऱ्या आपल्या राष्ट्राच्या खऱ्या हिरोंना सलाम
भारतीय सैन्य जिंदाबाद!
भारत माता की जय!
जय हिंद!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
riteish deshmukh indian army post
रितेश देशमुखची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर स्पष्ट सांगितलं होतं की सैन्यदलांनी दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. तरीही पाकिस्तानकडून सातत्याने हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पूंछ भागात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानने इतर राज्यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळवून लावला आहे. भारताने पाकिस्तानचे जवळपास ५० ड्रोन पाडले आहेत.