‘घर बंदूक बिरयानी’ हा नवाकोरा सिनेमा घेऊन नागराज मंजुळे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात नागराज मंजुळे एका दबंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचं कलाकार जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमने पुण्यात हजेरी लावली होती. प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान नागराज मंजुळे हलगी वाजवताना दिसून आले. नागराज मंजुळेंनी हलगी वादनाचा मनसोक्त आनंद लुटला. नागराज मंजुळेंच्या हलगीच्या तालावर आकाश ठोसर व सायली पाटीलनेही ठेका धरला. ‘घर बंदूक बिरयानी’ प्रमोशनदरम्यानचा हा व्हिडीओ शशांक साने या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> ‘पुष्पा’ स्टाइलमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरच्या अल्लू अर्जुनला शुभेच्छा, म्हणाला “पुष्पा २…”

नागराज मंजुळेंच्या हलगी वादनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अण्णांचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> Video: हास्यजत्रेतील ‘अवली लवली’ची ‘मुंबई इंडियन्स’लाही भुरळ, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा व्हिडीओ व्हायरल; नम्रता संभेराव कमेंट करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ७ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, नागराज मंजुळे व सयाजी शिंदे प्रमुख भूमिकेत आहे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हेमंत अवताडेंनी दिग्दर्शन केलं आहे.