गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऋता दुर्गुळे व वैभव तत्त्ववादीच्या ‘सर्किट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘सर्किट’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ऋता आणि वेभव तत्त्ववादी यांच्या रोमान्सने होते. त्यानंतर मात्र त्या दोघांच्या आयुष्यात वेगवेगळी वळणं येण्यास सुरुवात होते. त्यानंतर वैभवच्या सतत वैतागणाऱ्या, तापट स्वभावामुळे त्यांच्यावर कशीप्रकारे संकट उद्भवतात, हे पाहायला मिळत आहे. यात सतत वैतागणाऱ्या, चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हे पात्र वैभव तत्त्ववादी साकारत आहे. पण तो असा का आहे? त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ का येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष चित्रपटातच मिळणार आहेत.
आणखी वाचा : किसिंग सीन, अ‍ॅक्शन अन…; ऋता दुर्गुळे व वैभव तत्त्ववादीच्या नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत “सर्किट” या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन केले आहे.

आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने दिली प्रेमाची कबुली? पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत. त्याबरोबर अभिनेते मिलिंद शिंदे यात झळकताना पाहायला मिळत आहेत. येत्या ७ एप्रिलला “सर्किट” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.