गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऋता दुर्गुळे व वैभव तत्त्ववादीच्या नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच एका चित्रपटाच्या निमित्ताने ऋता व वैभव ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. या दोघांचा चित्रपट नेमका कोणता? असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला होता. अखेरीस चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वैभवने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. आणखी वाचा - प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…” ऋता व वैभवच्या चित्रपटाचं नाव 'सर्किट' असं आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये ऋता व वैभवमध्ये कमाल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर या दोघांच्या किसिंग सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेम, रोमान्स, अॅक्शनचा भरणा असलेला हा टीझर आहे. पाहा टीझर तसेच मराठीमधील हा एक थ्रीलर चित्रपट असल्याचं टीझरमधून दिसून येत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आकाश पेंढरकर यांनी केले आहे. तर मधुर भंडारकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये ऋता व वैभवच्या लव्हस्टोरीमध्ये एक ट्वीस्ट येतो पण त्यानंतर नेमकं काय घडतं? हे 'सर्किट'मध्ये पाहायला मिळेल. आणखी वाचा - सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच…” पण या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अनेकांनी याची तुलना दाक्षिणात्य चित्रपटाशी केली आहे. हा चित्रपट म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे असं काही प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे. तर काहींनी या टीझरचं कौतुक केलं आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये 'सर्किट'बाबत उत्सुकता वाढवली आहे.