लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ मध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर क्रांतीने आपल्या पतीला अनेकदा खंबीरपणे साथ दिल्याचे पाहायला मिळाले आहे. क्रांती आणि समीर वानखेडे या लोकप्रिय जोडीने अलीकडेच अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सहभागी होऊन वैयक्तिक गोष्टींबाबत खुलासा केला. क्रांतीने कौटुंबिक बाजू भक्कम ठेवल्यामुळे आज मी निश्चिंतपणे माझे काम करु शकतो असेही या वेळी समीर वानखेडे यांनी सांगितले.

हेही वाचा : “नाच ग घुमा”, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या मंचावर ‘बाईपण भारी देवा’ची टीम खेळली मंगळागौर, व्हिडीओ व्हायरल

क्रांती रेडकर पतीच्या कामाबद्दल सांगताना म्हणाली, “आम्ही दोघेही जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा काहीजण ‘तुमच्यामुळे माझ्या मुलाने ड्रग्ज सोडले’ असं सांगून त्यांच्या पडतात. या सगळ्या गोष्टी मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर आमच्याकडे थोडेसं दुर्लक्ष होत असेल तर काय फरक पडतो? अशी एक-दोन नव्हे तर हजारो उदाहरणं आहेत.”

हेही वाचा : “माझ्या घरची दुर्गा”, समीर वानखेडेंनी ‘त्या’ गोष्टीसाठी केलं बायकोचं कौतुक; म्हणाले, “क्रांतीसारखी जोडीदार सातजन्म…”

क्रांती पुढे म्हणाली, “माझे दीर सुद्धा पोलीसमध्ये आहेत. रात्री ३ वाजता ते घरी येऊन मला समीरच्या कामाबद्दल सांगत होते. ‘वहिनी हा माणूस वेडा आहे, याला कुठे पाठवू नकोस तू…डोंगरीसारख्या भागात थेट घुसतो, संपूर्ण टीम एकटा लीड करतो.’ असे त्यांचे अनेक किस्से मी ऐकले आहेत. यामुळेच ज्या लोकांची लायकी नाही असे काही लोक जेव्हा यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलतात, तेव्हा मला खरंच वाईट वाटतं. या लोकांना कोणी हक्क दिला? त्यांनी आधी देशासाठी काहीतरी करुन दाखवावं त्यानंतर बोलावं.”

हेही वाचा : “…म्हणून लग्नाच्या १० वर्षानंतर घेतला आई होण्याचा निर्णय”, राधा सागरने सांगितले कारण; म्हणाली, “गरोदरपणात नवरा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला आता दोन जुळ्या आहेत. “क्रांती मुलींची आणि घराची जबाबदारी घेत असल्याने आज मला कुटुंबाची चिंता नाही. सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवल्या आहेत आणि मला पुढचे सातजन्म क्रांतीसारखी बायको मिळावी” असे समीर वानखेडे यांनी सांगितले.