क्षितिज पटवर्धन हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पटकथा लेखक, नाट्य दिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्याने आज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट अभिनेता अभिनय बेर्डेबद्दलची आहे. लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनय सध्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात काम करत आहे. क्षितिजने अभिनय बेर्डेचा फोटो शेअर केला आहे, त्यात त्याच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर दिवंगत मराठी अभिनेते व अभिनयचे वडील लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील हा फोटो शेअर करत क्षितिजने सुंदर कॅप्शन दिलं आहे. अभिनयने वडिलांचा वारसा नाही तर वसा घेतलाय, अशा शब्दात क्षितिजने अभिनयचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – कंगना रणौतने प्रचारसभेत अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना; नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले, “हिचा शेवटचा…”

“मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे उभा अभिनय, फोटो काढताना असं वाटलं की बरीच मुलं वारसा घेतात, याने वसा घेतलाय. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी असेल! अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार, आणि उत्स्फूर्त अभिनेता. आज्जीबाई जोरात पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आईवडिलांची पुण्याई,” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos

अभिनयने या पोस्टवर कमेंट करत क्षितिजचे आभार मानले आहेत. “सर माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या संधी बद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, आपल्या नाटकाने मला खूप गोष्टी दिल्यात अभिनेता म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण, माझ्यावर हा विश्वास दाखवल्याबद्दल तुमचे खर्च खूप आभार आणि खूप खूप खूप खूप खूप जास्त प्रेम,” अशी कमेंट अभिनयने केली आहे.

हेही वाचा – सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

क्षितिज पटवर्धनच्या या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काहींनी या नाटकाबद्दल कमेंट करून विचारलं आहे, तर काहींनी रेड हार्ट इमोजी या पोस्टवर कमेंट केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.