राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आजपासून ‘गोदावरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. या निमित्ताने ‘गोदावरी’ या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, संजय मोने, नीना कुळकर्णी, लेखक प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक निखिल महाजन यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

गोदावरी चित्रपटात नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. ‘गोदावरी’ नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात पाहायला मिळणार आहे. ‘गोदावरी’ नदीविषयी मनात कटुता असणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं हा चित्रपट पाहिल्यावरच उलगडणार आहे. या चित्रपटाच्या शूटींग कोविड काळात झाले आहे. त्यामुळे तेव्हा आलेली आव्हाने, या चित्रपटाची कथा, सेटवरील गंमतीजमती याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ ही श्रवणीय गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आज ११ नोव्हेंबरला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.