‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सर्वत्र लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला कलाकार म्हणजे गौरव मोरे. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणून त्याला ओळखले जाते. गौरव मोरेचे लाखो चाहते आहेत. नुकतंच गौरवने त्याच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे तो चर्चेत आला.
गौरव मोरे हा लवकरच महापरिनिर्वाण या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटींग सध्या सांगलीत सुरु आहे. गौरवचा चाहतावर्ग फार मोठा असल्याने त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते गर्दी करत असतात. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “घर घेतलं, पण इंटेरिअरसाठी पैसे नाहीत”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व्यक्त केलं दु:ख, म्हणाली “माझा नवरा…”
या व्हिडीओत गौरव हा काही विद्यार्थ्यांच्या वहीवर सह्या करताना दिसत आहे. त्यात तो फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. “सांगलीत ( महापरिनिर्वाण) सिनेमाच्या निमित्ताने गेलो होतो आणि जिथे शूट करत होतो त्याच्या बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना समजले की माझं शूटिंग चालू आहे तर मुलं रोज फोटो काढायला आणि ऑटोग्राफ घ्यायला येत होती.तर त्या दिवशी असा हा ऑटोग्राफ चा खच माझ्याकडे आला तो हा क्षण थँक्यू सो मच, लहान लहान बच्चूना एवढं प्रेम दिल्ल्याबद्दल…”, असे गौरव मोरेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : “स्वप्न खरी होतात…”, ‘वहिनीसाहेब’ धनश्री काडगावकरने ठाण्यात खरेदी केली दोन घरं, व्हिडीओत दाखवली झलक
दरम्यान गौरवच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट आणि लाईक्स करताना मिळत आहेत. सध्या गौरव हा विविध चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गौरव हा ‘अंकुश’, ‘बॉईज ४’ आणि ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात झळकणार आहे. त्यात ‘अंकुश’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.