मराठी सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार हे खवय्येप्रेमी आहेत. पिठलं, भाकरी, झुणका ते अगदी मासे, चिकन, मटन यांसारख्या विविध पदार्थांवर ते कायमच ताव मारताना दिसतात. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या अभिनयासह स्वयंपाकातील कौशल्यही दाखवलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे तो कायमच चर्चेत असतो. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर 

जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही पदार्थांचे फोटो पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे यातील सर्वच पदार्थ त्याने स्वत:च्या हाताने बनवले आहेत.

जितेंद्र जोशीची पोस्ट

“माझ्यासाठी जेवण बनवणं हे जवळजवळ विपश्यने सारखेच आहे. ते बनवताना मी पदार्थ, चव, रंग, पोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम या गोष्टींना व्यवस्थित हाताळतो. जेव्हा माझी आई, पत्नी, मुलगी, मोलकरीण आणि मित्र ते खाऊन तृप्त होताना दिसतात. जेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो तेव्हा मला विशेष वाटते.

त्यामुळे मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की या पृथ्वीवरील प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे अन्न मिळावे. अन्न हे पूर्ण ब्रह्म!!! देव महान आहे!!”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी त्यावेळी दारोदारी फिरत होतो पण…” जितेंद्र जोशीने सांगितला महेश मांजरेकरांचा ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. “गोदावरीच्या चित्रीकरणावेळी ही टॅलेंट माहीत असती तर तुला स्वयंपाकघरातच कोंडून ठेवले असते !” असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर अभिनेता अनिकेत विश्वासरावने “तू कमाल आहेस”, अशा शब्दात जितेंद्रचं कौतुक केले आहे.