scorecardresearch

Premium

“जरासा बाजूला हो रं…”, सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “बायकांसोबत बॉक्स ऑफिस…”

“जरासा बाजूला हो रं…”, सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टवर सायली संजीवची कमेंट, म्हणाली…

siddharth chandekar hemant dhome (1)
सिद्धार्थ चांदेकर

करोना काळानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे झिम्मा. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली होती. जगभरातील प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरुन प्रेम केले. त्यानंतर आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकरने हटके पोस्ट केली आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू या अभिनेत्री दिसत आहेत. त्याबरोबरच ‘झिम्मा २’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमेही झळकत आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

sania mirza first post after shoaib malik wedding
शोएब मलिकच्या लग्नानंतर सानिया मिर्झाची पहिली पोस्ट; फोटोसह एका शब्दाच्या कॅप्शनने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले…
Ram Mandir Optical Illusion Bhakti Sees Shree Ram Written Thrills Netizens Call It Miracle Watch Video Half Open Eyes Trending Today
राम मंदिराच्या रचनेतील चमत्कार वाटावा असा Video चर्चेत; हा फोटो पाहून तुम्हाला कोणता शब्द दिसतोय सांगा?
Ram Mandir Ayodhya
श्रीरामाच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, गर्दी नियंत्रणाबाहेर, पोलीस म्हणाले, “अयोध्येला येऊ नका, आता थेट…”
Ayodhya Ram Mandir Prasad: What are the 7 items in Prasad box for invitees
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी भाविकांच्या प्रसाद बॉक्समध्ये कोणते ७ पदार्थ होते? फोटो आला समोर

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच हेमंतबरोबरचा एक छान फोटो पोस्ट केला आहे. याला सिद्धार्थने हटके कॅप्शन दिलं आहे. “पायघड्या घाल, ढोल ताशे वाजव अन् जरासा बाजूला हो रं.. बायकांसोबत बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालतायत झिम्माची पोरं!”, असे सिद्धार्थ म्हणाला.

आणखी वाचा : “हा ‘झिम्मा’ आधीपेक्षा…”, ‘झिम्मा २’बद्दल चिन्मय मांडलेकरने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सिद्धार्थच्या या पोस्टवर क्षिती जोगने “झिम्माची भारी पोरं” अशी कमेटं केली आहे. तर सायली संजीवने “Uffff” असे म्हणतं फायर इमोजी पोस्ट केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor siddharth chandekar share post with hemant dhome after release jhimma nrp

First published on: 25-11-2023 at 17:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×