अभिनेता आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुकही करत आहेत. नुकतंच सोहमने एका चाहतीला सडेतोड उत्तर दिले आहे.
सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सोहमने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील एका सीनचा फोटो पोस्ट करत एका मुलीने प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”
“सर तुमचा ऑटोग्राफ मिळेल का? आणि जर तू तुझ्या आयुष्यात पुढेही हे करणार असशील, तर मला अजिबात नवल वाटणार नाही. आता उगाचच मोठेपणा करु नकोस”, असे एका चाहतीने म्हटले आहे.
सोहमने या चाहतीच्या कमेंटवर सडेतोड उत्तर दिले आहे. “मी अजिबात मोठेपणाने वागत नाही, कारण मला माझी किंमत माहीत आहे”, असे सोहमने म्हटले आहे.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सुचित्रा बांदेकर यांनी पल्लवी काकडे ही भूमिका साकारली आहे. याच चित्रपटात सोहम हा पल्लवीचा मुलगा असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर सोहम बांदेकर लवकरच आणखी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.