Premium

सुबोध भावे आणि ‘चौक’ चित्रपटाच्या दिग्दर्शकामध्ये आहे खास नातं, म्हणाला “पुरूषोत्तम करंडकमध्ये…”

हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

subodh bhave
सुबोध भावे

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ या चित्रपटानंतर आता लवकरच ‘चौक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘चौक’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले आहे. त्याबरोबरच त्याने एक फोटोही शेअर केला.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

सुबोध भावेची पोस्ट

“पुरूषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये माझा सह स्पर्धक असलेला दया गायकवाड दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट घेऊन येत आहे.
आज महाराष्ट्रात तो प्रदर्शित होत आहे.
आजपर्यंत उत्तम भूमिका त्याने अभिनेता म्हणून वठवल्या आणि मला खात्री आहे दिग्दर्शक म्हणून सुध्दा त्याने उत्तम कामगिरी केली असेल.
दया दिग्दर्शक म्हणून तुझ्या या पहिल्या इनिंग साठी तुला मनापासून शुभेच्छा. नक्की चित्रपट पहा….”, असे सुबोध भावेने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्याच्या मनगटाचे हाड मोडले, अभिनेत्री म्हणाली “या माणसाने…”

दरम्यान ‘चौक’ या चित्रपटात प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आता हा चित्रपट आज २ जून रोजी प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor subodh bhave share special post chowk marathi film director nrp