अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा ‘वेड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश देशमुखची पत्नी जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुखचा ‘वेड’ आणि परेश मोकाशी यांचा वाळवी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: ‘वेड’ लावलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जिनिलिया पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकली. यातच आता अभिनेता स्वप्निल जोशीने एक ट्वीट केले आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी हा सध्या त्याच्या वाळवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच स्वप्निल जोशीने रितेश देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याने हा चित्रपट त्याला कसा वाटला, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल !
केवळ क. मा. ल. कामगिरी !
मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन
रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!, असे ट्वीट स्वप्निल जोशीने केले आहे.

स्वप्निल जोशीने केलेल्या या ट्वीटवर रितेश आणि जिनिलीया या दोघांनीही मराठीत रिप्लाय दिला आहे. रितेश देशमुखने यावर कमेंट करताना म्हटलं की, “भाऊ…. मनापासून आभार – big hug लवकर भेटू !!!” तर अभिनेत्री जिनिलीया देशमुखने प्रतिक्रिया देताना “तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धान्यवाद..” असे म्हटलं आहे. जिनिलीयाचा हा मराठी अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला ‘वेड’ चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारी १ कोटी ३५ लाख, शनिवारी २ कोटी ७२ लाख आणि शनिवारी २ कोटी ७४ लाखांची कमाई केली आहे. ‘वेड’ सिनेमाचं एकूण कलेक्शन ४७ कोटी ६६ लाख रुपये इतकं झालं आहे.