‘अग्निहोत्र’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा सिद्धार्थ चांदेकर आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. सिद्धार्थतला मराठीतील चॉकलेट बॉय देखील म्हटलं जात. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठीत नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण इथंवर पोहोचण्यासाठी अभिनेत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यामुळे सिद्धार्थला कमी वयातच जाण आली. या वयात वडिलांचं छत्र नसतानाही आई, बहीण आणि त्याने त्यांचं कुटुंब सावरलं. पण याकाळात शेजाऱ्यांनी मुद्दाम खोचक प्रश्न विचारून मज्जा घेतली. नुकत्यात एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने ‘तो’ काळ सांगितला.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी सिद्धार्थने, ज्या काळात कुटुंबात अस्थिरता होती, तेव्हा शेजारील लोक कशाप्रकारे वागायचे? याविषयी सांगितलं. अभिनेता म्हणाला, “लहानपणी शेजारचे नको ते प्रश्न मुद्दाम विचारायचे. बाबा कुठे आहेत? असे प्रश्न शेजारचे लोक आम्हाला सतत विचारायचे. उगीचच. आमच्या आणि त्यांच्यामध्ये एका भिंतीचं अंतर असायचं, त्यांना सगळं ऐकून जातं, आमच्या घरातलं सगळं माहित असतं. हा एक हळवा मुलगा आहे, मुलगी आहे, हे देखील माहित असून सुद्धा यांच्याकडून आपण मज्जा घेऊया, यासाठी काय मग वडील कुठे आहेत? कसली भांडणं चालली होती? हे प्रश्न फारच छान विचारले गेले. त्यावेळेस आम्हाला एवढं कळतं नव्हतं की, कशा पद्धतीने उत्तर द्यायचं.”

sankarshan karhade share experience to visit raj thackeray home
“राज साहेबांनी घरी बोलावलं, ठाकरे-पवारांचा फोन आला अन्…”, संकर्षण कऱ्हाडेच्या ‘त्या’ राजकीय कवितेनंतर काय घडलं? म्हणाला…
Eknath shinde and sharad pawar
“मग शरद पवारांवर ही वेळ का आली?” ‘शपथनामा’वरून एकनाथ शिंदेंची बोचरी टीका, म्हणाले…
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला

हेही वाचा – ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे करोडोंचे इलेक्टोरल बॉन्ड अन् १४४६ कोटींचा बंगला, किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “आदर पुनावालाला कुठला..”

“मग आम्हाला असं वाटायचं, यांच्यामध्ये उभं राहायला नको. कारण आमचं कुटुंब असं झालंय. आपलीच चुक आहे, आपलं कुटुंब असं आहे, हे वाटायचं. पण आता मला असं वाटतं की, उत्तर देण्याची गरजचं नाहीये. ना मला, ना माझ्या बहिणीला, ना आईला. मला एक माहितीये आहे की, शब्दांचं उत्तर फारस महत्त्वाचं नाहीये. तुमच्या कृतीचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तिघांनी आमच्या कृतीतून त्यांची तोंड बंद केली आहेत; ज्यांनी आम्हाला हे प्रश्न लहानपणापासून विचारलेत. काही कोणाला उत्तर न देता आम्ही आमचं काम, कुटुंब मनापासून जपतं आलो आणि सर्वकाही प्रामाणिकपणे करत आलो. हे माझं उत्तर आहे,” असं सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा – Video: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दणक्यात साजरा झाला आलिया भट्टचा वाढदिवस, अंबानी कुटुंबाने लावली हजेरी

दरम्यान, सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो ‘श्रीदेवी प्रसन्न’ आणि ‘ओले आले’ या चित्रपटात पाहायला मिळाला. त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.