जगभरात आज ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुलांनी ‘मदर्स डे’ निमित्त विविध कलाकार पोस्ट शेअर करताना दिसतात. नुकतंच अभिनेत्री हेमांगी कवीनने तिच्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असेत. नुकतंच हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आईबरोबरचा एक खास फोटो शेअर केला आहे. याला तिने लांबलचक कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हेमांगी कवीची पोस्ट

“Mummy! जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे. तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच.

तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे, नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीनाआखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं, प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती), हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब!

प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्याबाबतीतले चढ-उतार बघता मला कायम प्रश्न पडतो आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस? आताही! निव्वळ कमाल! आया great असतातच पण तु कायच्या काय great आहेस! म्हणूनच प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा!”, अशी पोस्ट हेमांगी कवीने केली आहे.

आणखी वाचा : पालकांच्या प्रायव्हसीबद्दल हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हेमांगीच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. “तुम्ही मला आईसारखेच वाटता”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “तुमचे डोळे आई सारखे आहेत…. हसरे आणि बोलके”, असे कमेंट करत म्हटले आहे. “किती सुंदर कॅप्शन” अशी कमेंट एकाने केली आहे.