scorecardresearch

Premium

ऋता दुर्गुळे झळकणार नव्या चित्रपटात, पहिलं पोस्टर आलं समोर

आता लवकरच ऋता एका नवीन चित्रपटात झळकणार आहे.

Hruta Durgule
ऋता दुर्गुळे

अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे ऋता घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच अनेक मराठी चित्रपटातही ती झळकली. या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला. आता लवकरच ऋता एका नवीन चित्रपटात झळकणार आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा विषयावर आधारित हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टरही समोर आले आहे.
आणखी वाचा : Pooja Sawant Engaged : “We are engaged…”, पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो समोर

Vicky Jain Tia bajpayee photos
अंकिता लोखंडेआधी विकी जैनच्या आयुष्यात होती ‘ही’ अभिनेत्री, अनेक मालिका व चित्रपटांमध्ये केलंय काम, फोटो व्हायरल
Marathi Actress Sonalee Kulkarni malaikottai vaaliban malayalam movie Mohanlal Lijo Jose Pellissery marathi film industry
मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”
fighter banned in gulf countries
हृतिक रोशनच्या ‘फायटर’ला प्रदर्शनाआधी मोठा धक्का; ‘या’ देशांमध्ये चित्रपटावर बंदी, कारण…
siddharth jadhav and dilip prabhavalkar new marathi movie hazaar vela sholay pahilela manus
“हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” सिद्धार्थ जाधवचा हटके चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. यात ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर निर्माते अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर आणि सनी राजानी आहेत. या चित्रपटाच्या वितरणाची धुरा ए ए फिल्म्स यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशींनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याप्रमाणे बेभान उडणारा पतंग हवेत त्याचा तोल मजबूत कन्नीमुळे सांभाळू शकतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याचा, स्वप्नांचा पतंग देखील मैत्री, प्रेम यांची मजबूत कन्नी असली की अगदी चंद्राशेजारीसुद्धा पोहोचू शकतो! याच प्रेम आणि मैत्रीच्या ‘कन्नी’ची तरूण, ताजी, मस्तीखोर आणि तितकीच आपलीशी वाटेल अशी गोष्ट म्हणजे ‘कन्नी’ हा चित्रपट”, असे समीर जोशी म्हणाले. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मैत्री आणि प्रेमाला जोडणारी ही ‘कन्नी’ नात्यांची एक नवीन गोष्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actress hruta durgule kanni new movie first poster release date nrp

First published on: 28-11-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×