Pooja Sawant Engagement : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंतने आता चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

पूजा सावंतने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यात तिने We are engaged असं म्हणत काही फोटो पोस्ट केले आहे. या फोटोत ती आणि एक मुलगा दिसत असून यात ती तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसत आहे.
आणखी वाचा : “ते दोघेही माझे…”, पूजा सावंतने केलं वैभव तत्त्ववादी आणि भूषण प्रधानबरोबरच्या नात्यावर स्पष्ट भाष्य, म्हणाली…

malaika arora came home after father death see video
Video: वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच घरी परतली मलायका अरोरा; अर्जुन कपूर अन् अरबाज खानचे कुटुंबीयही पोहोचले
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
Shah Rukh Khan welcomes ganpati bappa at mannat
शाहरुख खानच्या घरच्या बाप्पाला पाहिलंत का? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिल्या चाहत्यांना शुभेच्छा; म्हणाला, “आपल्या सर्वांना…”
Teachers Day History and Significance in Marathi
Teachers Day 2024 : सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील रंजक गोष्ट
Ganesh Chaturthi 2024 Wishes Quotes SMS in Marathi| Ganesh Utsav 2024 Wishes Quotes SMS in Marathi| Happy Ganesh Chaturthi 2024 Wishes in Marathi
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त WhatsApp, Facebook वर तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी खास मराठी शुभेच्छा! पाहा यादी…
attar short film in Egypt
‘अत्तर’ लघुपटाची इजिप्त येथील महोत्सवात निवड
Anita Hassanandani worked as receptionist
वडिलांना दारूचं होतं व्यसन, उदरनिर्वाहासाठी मनोज कुमार यांच्या ऑफिसमध्ये केलं काम; प्रसिद्ध अभिनेत्रीला अश्रू अनावर

“माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, असे पूजा सावंतने म्हटले आहे.

पूजाने सलग तीन इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील सर्व फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे पूजाचा होणारा नवरा कोण, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

आणखी वाचा : ‘झिम्मा १’नंतर ‘झिम्मा २’ चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांची मनं, तीन दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान पूजाच्या या पोस्टनंतर अनेक कलाकार यावर कमेंट करताना दिसत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक सिनेसृष्टीतील कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.