‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच मानसीने तिचे लग्न आणि घटस्फोट याबद्दल सविस्तर भाष्य केले.

मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असायचे. ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर वर्षभरात तिने घटस्फोट घेत असल्याबद्दलची माहिती दिली.
आणखी वाचा : “मला आई व्हायचे होते”, मानसी नाईकने सांगितलं लग्न करण्यामागचं खरं कारण, म्हणाली “मी ग्लॅमरस…”

नुकतंच मानसीने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मी इतके दिवस फार भ्रमात वावरत होती. पण माझ्या भ्रमाचा भोपळा आताच काही महिन्यांपूर्वी फुटला. माझा भ्रम असा होता की, मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं वैगरे असं मला वाटतं होतं. त्यात काहीच बरोबर नव्हतं. खरंतर रीलपुरतंच हा प्रवास होता. फक्त मीडिया, प्रसिद्धी या गोष्टींसाठी हे सर्व होतं. मला जे काही सांगण्यात आलं, त्यातील एकही गोष्ट खरी नव्हती. ते सर्व खोटं होतं आणि ते कायदेशीररित्या पकडलं गेलं. त्यामुळे कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी सुरु आहेत.”

“मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं अपुरं राहिलं आहे. पण मी आता ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही. मला त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी वापरण्यात आलं. महाराष्ट्रीयन प्रेक्षक मिळवण्यासाठी माझा वापर करण्यात आला. त्यावेळी मला काहीही वाटत नव्हतं. जेव्हा कोणतीही मुलगी लग्न करते, तेव्हा तिला मिळालेली शिकवण ही कायमच आडवी येते. त्यानंतर आपण चुकीचा रस्ता पकडला आहे, चुकीच्या माणसाबरोबर, हे जेव्हा कळतं, असं वाटतं तेव्हा कुठलीही मुलगी लग्न टिकवण्याचा प्रयत्न करते. मीही ते केले.

मी लग्न टिकवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण कुठेतरी नंतर डोक्यावरुन पाणी जायला लागलं. पण त्या काळात मी एकटी आहे, हे कधीही दाखवलं नाही. मी पत्नीधर्म निभावला. मी आता मुलींना एकच सांगू इच्छिते की, ममता ही फक्त आईची असावी, बायकोची नाही. आईनं ममता दाखवणं फार वेगळं आहे. पण बायकोने जेव्हा ममता दाखवायला सुरुवात केली, तेव्हा तो नवरा सुटलाच समजा. माझं तसंच झालं. मी बायको म्हणून नाही तर आई म्हणून सर्व गोष्टी केल्या. वडील, भाऊ, मोठी बहीण म्हणून अनेक गोष्टी केल्या. पॉकेटमनी देण्यापासून सर्वच गोष्टी मी केल्या. पण इतकंही कोणाला लाडोबा बनवायचं नाही किंवा कोणाचेही पंख कापायचे नाहीत. ज्याने त्याने त्याचं उडायला शिकावं. ते माझं काम नाही. ते त्याच्या आई-वडीलांचं काम आहे”, असे मानसी म्हणाली.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

“मला भरपूर ट्रोल करण्यात आलं. मी पैशांसाठी लग्न केलं किंवा महाराष्ट्रीयन मुलाबरोबर लग्न केलं नाही, म्हणून असं झालं, असंही बोलण्यात आलं. मी पैशांसाठी लग्न केलं हे खरंतर उलट आहे. कारण मानसी नाईकचा अभ्यास करण्यात आला होता. तिला लग्न करायचं आहे, ती एक पारंपारिक मराठी पुणेकर मुलगी आहे. तिला धार्मिक गोष्टी करायला आवडतात. घरात स्वयंपाक करायला आवडतो आणि माझ्या घरात हेच वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी त्यांच्या घरी धुणी भांडी करण्यापासून झाडू काढणे, लादी पुसणे यासर्व गोष्टी केल्या आहेत. मी मनापासून या सर्व गोष्टी केल्या. जरी स्वतची चूक असेल ना तरी ही तुझी चूक आहे आणि तुझ्यामुळे मी ही चूक केली, असं म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यामुळे मी माझ्या स्वत:वर संशय घ्यायला लागले होते”, असेही तिने यावेळी सांगितले.