मराठी सिनेसृष्टीत ‘कलरफूल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला. सध्या अभिनेत्री लग्नानंतरचे दिवस परदेशात एन्जॉय करताना दिसत आहे. अशातच आज पूजाची सख्खी बहीण रुचिरा सावंतचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पूजाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री पूजा सावंतने बहीण रुचिराबरोबरचे लग्नातील काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिल्या आहेत. पूजाने लिहिल आहे, “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन देणारी तू आहेस. मला वाटतं नाही की, तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझं ध्येय साध्य करू शकले असते का? सुखी राहा…आनंदी राहा. मी तुझ्या पाठिशी सदैव उभी राहीन…मग ते काहीही असो. मी तुला एक वचन देते की, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे असेन. तू तुझं संपूर्ण आयुष्य मजेत जग आणि विसरू नको ‘दीदी तुझ्या नेहमी पाठिशी आहे.'”

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा – Oscar 2024: एकदा नाही तर दोनदा जिंकला ‘या’ बहीण-भावाच्या जोडीने ऑस्कर! ८७ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

हेही वाचा – Video: अभिनेत्री गौतमी देशपांडेने पती स्वानंद तेंडुलकरसह केली राणी बागची सफर, व्हिडीओ व्हायरल

रुचिरा काय काम करते?

गेल्या वर्षी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये पूजा व रुचिरा सहभागी झाल्या होत्या. तेव्हा रुचिराने स्वतःच्या कामाविषयी सांगितलं. रुचिरा ही एक प्रमाणित (सर्टिफाइड) प्राणी बचावकर्ती आहे. बारावीपासून तिने अनेक एनजीओमध्ये काम केलं आहे. याशिवाय रुचिराचा स्वतःचा रिओवे (RIOWAY) नावाचा ब्रँड आहे. गेल्यावर्षी रुचिराने हा ब्रँड सुरू होता. पूजा व तिच्याकडे एक रिओ नावाची खारुताई होती; जिचा मृत्यू झाला. त्याच खारुताईच्या आठवणीत पूजाच्या बहिणीने ‘रिओवे’ ब्रँड सुरू केला. या ब्रँडच्या माध्यमातून आकर्षक अशी ज्वेलरी तयार केली जाते. पूजाच्या लग्नामध्ये रुचिराने स्वतःच्याच ब्रँडची ज्वेलरी घातली होती.