केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. सध्या सर्वत्र ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे कौतुक पाहायला मिळत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सुकन्या मोने यांनी अनेक वर्षांनी माहेरच्या बालमैत्रिणींशी गप्पा मारल्या. त्यावेळीचा एक एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

सुकन्या मोने यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुकन्या मोने यांच्या काही मैत्रिणी त्यांचं स्वागत करताना, त्यांची ओवाळणी करताना दिसत आहेत. यावेळी सुकन्या मोनेही भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : “मी पहिल्यांदा सासूसमोर ‘पाडाला पिकला आंबा’ म्हटलं अन्…” वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा, म्हणाल्या “नवऱ्याची मान…”

सुकन्या मोने यांची पोस्ट

“बाईपण भारी देवा! ” ला घवघवीत यश प्राप्त झालंय आणि अजूनही होतय…. होईल…. सगळीकडे संपूर्ण टीमचे कौतुक होतय…. पण जेव्हा आपल्या माहेरच्या बालमैत्रिणी आपल्याला सरप्राईज देतात…. साडी ने ओटी भरतात…. नानाविध स्वतःच्या हाताने केलेली कलाकृती भेट म्हणून देतात…. लेख लिहितात…. गॉगल लाऊन फोटो काढतात आणि आवडते खाद्यपदार्थ करतात….. माझ्या फोटोंचे मास्क लाऊन माझे स्वागत करतात….. औक्षण करतात …. केक आणतात ….. कित्ती कित्ती आणि काय सांगू….

ज्या काकूंनी लहानपणापासून पाहिले आहे त्या पत्राद्वारे कौतुक, प्रेम, आशीर्वाद देतात तेव्हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मिळाल्या सारखा वाटतो….. त्यांचे प्रेम …. आपुलकी…. मायेचा ओलावा…. हीच माझी खरी कमाई आहे…… खूप खूप श्रीमंत झालेय मी….. ह्याच्यापेक्षा friendship day च्या उत्तम शुभेच्छा काय असू शकतात!! वर्षा,माधवी,साधना,सुचेता,अनु,मृणाल, निवेदिता,जयश्री ताई,मंगल आणि तिचे कुटुंब, असे सुकन्या मोने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुम्ही ब्राह्मण असूनही मांसाहार करता?” चाहतीच्या कमेंटवर सुकन्या मोने म्हणाल्या, “ते चांगलं की वाईट…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.