दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मिळत आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या सध्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच केदार शिंदे यांनी रोहिणी हट्टंगडी आणि त्यांची भेट कशी झाली आहे, याचा किस्सा सांगितला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटोदेखील शेअर केला आहे.
आणखी वाचा : “माझ्यासाठी उभे न राहणारे लोक…” उर्मिला मातोंडकरचे मोठे वक्तव्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

केदार शिंदे यांची पोस्ट

“आयुष्यात फक्त समोरा समोर आल्यावर हाय हॅलो नमस्कार, या व्यतिरिक्त काही झालं नाही. कारण मनावर ती समोर आली की, दडपण असायचं. बरं ती तशी दडपण देणारी नाहीच. पण या आधी जी तीने कामं केला आहेत, त्याचा प्रभाव एवढा की, न मागता दडपण यायचं. गांधी, सारांश, चालबाज, अग्नीपथ… एका पेक्षा एक सरस भुमिका डोळ्यासमोरून सरकल्या, जेव्हा मी तीच्या दारात उभा होतो तेव्हा!!

baipanbhaarideva साठी जर ती नाही म्हणाली तर??? मनात चलबिचलता! पण भुमिका ऐकताच एका क्षणात होकार दिला. पुढे काम करताना जाणवलं की, ती खुप सोपी आहे. तीचं तीचं तीने रिंगण निर्माण केलंय, ते तीच्या कामाने! तीचात attitude नाही… पण खुपचं professional approach आहे. ती तुमच्यात असते पण, नसते पण! कलाकाराने असच असायला हवं. स्क्रीनवर किती आणि केवढं काम करायचं? याचं गाईड आहे ती. मी या सिनेमाच्या निमित्ताने खुप शिकलो. ती लेक्चर देत नाही. पण तीची शांतता खुप शिकवून जाते. सिनेमातली जया म्हणजे माई अगदीच अशी आहे. रोहिणी हट्टंगडी मला वादळापूर्वीची शांतता वाटते. आणि ते वादळ फक्त अभिनयाचं असतं…”, असे केदार शिंदे यांनी म्हटलं.

आणखी वाचा : “माझा आता कोणताही संबंध नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने दिला राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट शुक्रवारी ३० जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे.