लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला सरसेनापती हंबीरराव या चित्रपट चांगलाच हिट ठरला. त्यानंतर ते शेतीच्या कामामध्ये रमले होते. त्यानंतर आता त्यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

यंदा करोनानंतर दोन वर्षांनी सर्वत्र दणक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. अनेकांनी मोठ्या थाटामाटात दिवाळी हा सण साजरा केला. अनेक कलाकारांनी त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता प्रवीण तरडेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : “हा चिखल आपणही दागिन्यासारखा मिरवू…” प्रवीण तरडेंचा शेती करतानाचा व्हिडीओ व्हायरल

प्रवीण तरडे कायमच उत्तम आरोग्याबाबत संदेश देत असतात. याआधीदेखील त्यांनी अनेक वेळा व्यायामशाळेतील फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर आता परत एकदा व्यायामशाळेत व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला बॅकग्राऊंडला छान गाणेही वाजताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शनही दिले आहे. ‘बाय बाय फराळा आता फक्त धुराळा’, असे प्रवीण तरडेंनी म्हटले आहे. प्रवीण तरडेंच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांना त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले आहेत.

आणखी वाचा : “मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण तरडे अनेक वर्ष चित्रपट, नाट्यसृष्टीत कार्यरत आहेत. मध्यंतरी ते कामामधून निवांत वेळ मिळाल्यानंतर पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे फिरण्यासाठी गेले होते. प्रवीण तरडे यांनी आपल्या करियरची सुरवात मराठी एकांकिकांपासून केली, मालिका लेखन, चित्रपट लेखन आता अभिनय दिग्दर्शन असा त्यांचा प्रवास आहे.