नटरंग’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’सारखे सुपरहीट चित्रपट देणारे मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी बॉलिवूडमध्येसुद्धा त्यांचं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. यातील त्यांच्या ‘टाइमपास’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील संवादांमुळे हा चित्रपट गाजला होता. आजही प्रेक्षकांना यातील संवाद लक्षात आहेत. या चित्रपटाचा नुकताच तिसरा भाग प्रदर्शित झाला होता. याबाबतची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या अनेक पुरस्कार सोहळे सुरु आहेत. ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा पुरस्कार सोहळ्यात टाईमपास ३ चित्रपटाला अनेक नामांकन मिळाली आहेत, त्यावर रवी जाधव यांनी पोस्ट लिहली आहे, “टाईमपास ३ ला मिळालेल्या अनेक नामांकनबद्दल सर्वप्रथम झी टॉकीज आणि ज्युरींचे आभार, कोरोना काळात चित्रीकरण होईल की नाही अशी टांगती तलावर डोक्यावर असतानाही मला साथ ड्नेरे निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे मनापासून आभार.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दीपिकानंतर आता परिणीती चोप्रा नेटकऱ्यांच्या रडारवर; भगवा ड्रेस परिधान केल्यामुळे झाली ट्रोल

या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत प्रथमेश परब, ऋता दुर्गुळे ही पालवी, माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, शांताराम परब म्हणजे भाऊ कदम, आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि पालवीच्या वडिलांच्या भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळाले होते.

या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. तर संगीत अमितराज यांचं आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून प्रियदर्शन जाधव याने चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास ३’ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi director ravi jadhav shared post regarding timepass 3 film nominations spg
First published on: 18-12-2022 at 16:19 IST