बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली जादू केली होती. या चित्रपटानंतर आता लवकरच ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक टीझर पोस्ट केला आहे. या टीझरची सुरुवात पिकनिकचे प्लॅनिंग करण्यापासून होते. यावेळी सिद्धार्थ व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्व स्त्रियांना मेसेज करतो. “बायांनो, पुढच्या ट्रीपची तयारी करायला घ्या. कारण आहे इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस. जो तिला आपल्याबरोबर साजरा करायचा आहे आणि तिच्याकडे एक सरप्राईज आहे”, असे सांगतो. त्यानंतर तो उठून जातो आणि काय हौस आहे मला असे पुटपुटतो.
आणखी वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Tejaswini Pandit film Yek Number will be screened on october 10
तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ चित्रपटाचे १० ऑक्टोबरला प्रदर्शन
The movie Ghaat will be released on September 27
‘घात’ चित्रपटाचे २७ सप्टेंबरला प्रदर्शन

यानंतर त्याच्या फोनवर पटापट मेसेज येण्यास सुरुवात होते आणि त्याचा फोनची रिंगटोन सतत वाजत असते, असे या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. आता इंदू डार्लिंग च्या ७५ व्या वाढदिवसासाठी कोण कोण येणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

येत्या २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकरल्या होत्या. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यात कोण कोण कलाकार असणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.