गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे अनेक मराठी कलाकारही लग्नबंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या गोड आवाजाने कानसेनांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर लवकरच लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच तिने यावर भाष्य केले आहे.

आर्या आंबेकर ही झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शो मुळे प्रसिद्धीझोतात आली. आर्या आंबेकर ही आज अनेकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनय क्षेत्रातदेखील तिचं नशीब आजमावलं आहे. आज तिचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. नुकतंच एका मुलाखतीत आर्याला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फारच मजेशीर पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : “हॉलिवूडपेक्षा बॉलिवूड चांगले” शाहरुखच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रियांका चोप्राचा संताप, म्हणाली “डोक्यात हवा…”

“अरे, मी यावर्षी लग्न करत नाही. या सर्व मागची मोठी गुन्हेगार व्यक्ती म्हणजे कार्तिकी गायकवाड. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकी गायकवाड जिने लग्न केलं. तिने लग्न केल्यामुळे आता सर्वजण तू लग्न कर, तू लग्न कर म्हणून माझ्या मागे लागलेत. त्यांना माझ्याबद्दल काहीही कळत नाही, म्हणून ते अशा अफवा पसरवतात. माझा लग्नाचा वैगरे आता काहीही विचार नाही”, असे आर्याने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “तो पैशांसाठी गेला…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाने ओंकार भोजनेच्या एक्झिटवर मांडलेले मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहे. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.