आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या. आज १७ जुलै रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येला विशेषत: दिव्यांचे पूजन केले जाते. वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. या अमावस्येनिमित्त प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने एक पोस्ट शेअर केली आहे.

अवधूत गुप्ते हा सध्या खुपते तिथे गुप्ते या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. मराठीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या गाण्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अवधूतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

अवधूत गुप्तेने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याच्या खिडकीवर एक पक्षी पाहायला मिळत आहे. याला त्याने फारच मजेशीर कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : इलियाना डिक्रुझने पहिल्यांदाच दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाली…

“आता.. ‘दर्श अमावस्ये‘ (गटारी) दिवशी सकाळ सकाळ खिडकीवर ‘Kingfisher’ च येऊन बसल्यावर माणसानं काय करावं बुवा?!! #आमचंश्रीकृष्णनगर”, असे अवधूत गुप्तेने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधूत गुप्तेच्या या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने चिअर्स अशी कमेंट केली आहे. तर आदर्श शिंदे, सलील कुलकर्णी, मेघना एरंडे या कलाकारांनी हसण्याचे इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.