‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. सध्या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटात फिटनेस ट्रेनरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव समोर आलं आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात शरद पोंक्षे, पियुष रानडे, सोहम बांदेकर हे कलाकारही झळकताना दिसत आहे. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये या बायकांना फिटनेसची ट्रेनिंग देण्यासाठी एक ट्रेनर दाखवण्यात आला आहे. हा फिटनेस ट्रेनर म्हणजे ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण आहे.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

वरद चव्हाणने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात फिटनेस ट्रेनर ही व्यक्तीरेखा साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. वरद चव्हाण हा ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरद हा काही महिन्यांपूर्वी ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत झळकला होता. त्यात त्याने भास्कर नावाचे पात्र साकारले होते. या भूमिकेसाठी त्याला लोकप्रिय सहाय्यक व्यक्तिरेखा या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याबरोबरच तो ‘वास्तू रहस्य’ या मालिकेतही झळकला होता. वरदने ‘तुझी माझी लव्हस्टोरी’, ‘वात्सल्य’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘फेकम् फाक’, ‘खो खो’ यांसह अनेक चित्रपटात झळकला होता.

दरम्यान वरदने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी विविध नाटकांमध्ये काम करत असताना त्याने मालिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. सध्या वरदचे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील फिटनेस ट्रेनरच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.