महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची महागाथा सांगणाऱ्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका भव्य सोहळ्यात जाहीर करण्यात आली आहे. हा सोहळा मुंबईतील वडाळा येथे राम मंदिरात संपन्न झाला. अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधत या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. हा सिनेमा २२ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी सोनाली कुलकर्णी, आशय कुलकर्णी, तसेच चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व दिग्दर्शक राहुल जाधव उपस्थित होते.

निर्माते अक्षय बर्दापूरकर म्हणाले, “चित्रपटाचे पोस्टर अनावरण हे केवळ चित्रपटाचीच ओळख करून देणार नाही तर या महत्वाच्या दिवसाचे अध्यात्मिक महत्वही आत्मसात करणार आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ यांच्या शौर्याला मानवंदना आहे. हा गौरवशाली इतिहास आपल्या सर्वांसाठी लवकरच घेऊन येत आहोत. आमचा हा प्रयत्न इतिहास रसिकांना तसेच प्रेक्षकांना नक्की आवडेल, अशी आशा करतो.”

Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”
chat with terav marathi movie team members
‘तेरवं’ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची संघर्ष कथा

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

गोल्डन रेशियो फिल्म्स, किंग्जमेन प्रॉडक्शन प्रस्तुत, अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि मंत्रा व्हिजन यांच्या सहयोगाने डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, दीपा त्रासी निर्मित या चित्रपटाचे क्रिएटिव्ह वाईब, सौम्या मोहंती विळेकर, समीर अरोरा सहनिर्माते आहेत.