55th International Film Festival of India: ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ मध्ये (IFFI 2024) नवज्योत बांदिवडेकरला ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. २६ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘घरत गणपती’ या चित्रपटात कोकणातील गणेशोत्सव व घरत कुटुंबातील नात्यांची गुंतागुंत या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या.

भारतीय सिनेमात युवा प्रतिभावंतांच्या योगदानाची दखल घेत देशभरात चित्रपट निर्मिती करणाऱ्या युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने यंदाच्या इफ्फी आवृत्तीसाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार नव्याने सुरू केला आहे.

हेही वाचा – ब्रेकअपनंतर मलायका अरोरा झाली बिझनेसवुमन! ‘या’ खास व्यक्तीबरोबर पार्टनरशिप, ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केलं रेस्टॉरंट

पुरस्काराचे स्वरुप

प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार इफ्फीच्या समारोप सोहळ्यात नवज्योत बांदिवडेकरला त्याच्या ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटात प्रभावीरित्या मांडलेल्या कथेसाठी प्रदान करण्यात आला. परंपरा आणि आधुनिक संवेदनांना जोडणारी हृदयस्पर्शी कथा सादर करण्याच्या क्षमतेबद्दल परीक्षकांनी बांदिवडेकरच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले.

“बांदिवडेकरने कौटुंबिक बंधांची गुंतागुंत मोठ्या चांगल्या रितीने मांडली आहे. कौटुंबिक जीवनातील बारकावे उत्तमरित्या अधोरेखित केले आहेत, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात चित्रपटात सगळ्या गोष्टी उत्तम जमून आल्या,” अशा शब्दांत ज्युरींनी त्याचे कौतुक केले.

हेही वाचा – माधुरी दीक्षितवर जडला जीव, मॅच फिक्सिंगमध्ये अडकला अन् तिने…; भारताच्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूची अधुरी प्रेमकहाणी

पूर्वावलोकन समितीने शिफारस केलेल्या पाचही चित्रपटांचे पुनरावलोकन केल्यानंतर, ज्युरींनी त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बांदिवडेकरची एकमताने निवड केली. प्रशस्ती पत्रात ज्युरींनी ‘घरत गणपती’चे सुरेख कथा सादरीकरण आणि दमदार अभिनयाबद्दल कौतुक केले आहे. “वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये काही छोटे मतभेद असले तरी कुटुंबातील ऐक्याचे प्रभावीरित्या दर्शन घडवले आहे,” असे ज्युरींनी प्रशस्ती पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘घरत गणपती’मधील कलाकार

भूषण प्रधान, निकिता दत्ता, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे व इतर अनेक कलाकारांची या सिनेमात मांदियाळी होती.