मराठी नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेते अजय पुरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘पावनखिंड’ चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे ही भूमिका तर प्रचंड गाजली. फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक निर्माता म्हणूनही काम करण्यास ते सज्ज झाले आहेत. अजय यांनी काही महिन्यांपूर्वीच जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना केली. पण सध्यातरी ते त्यांच्या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.

आणखी वाचा – “कोणताच मुर्खपणा…” ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरींची ‘आदिपुरुष’बाबत स्पष्ट प्रतिक्रिया

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

काही दिवसांपूर्वी अजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. जिममध्ये अजय व्यायम करताना दिसत आहेत. तसेच त्यांचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

अजय यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून ते त्यांच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देतात हे दिसून येतं. “नवीन प्रवास व नवा प्रोजेक्ट सुरु.” असं त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होतं. या व्हिडीओमध्ये ते विविध व्यायामप्रकार करताना दिसत आहेत. तसेच त्यांची शरीरयष्टी पाहून लवकरच एका अनोख्या भूमिकेमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट होतं.

आणखी वाचा – Video : पत्नीला पाहताच मिठी मारली अन् रडू लागले अमिताभ बच्चन, पण नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात, खूप सुंदर अशा अनेक कमेंट अजय पुरकर यांचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केल्या आहेत. तर अनेकांनी त्यांच्या फिटनेसचं कौतुक केलं आहे. अजय यांनी याआधी ‘असंभव’, ‘अस्मिता’, ‘तू तिथे मी’, ‘मुलगी झाली हो’ अशा अनेक मालिका तसेच ‘कोडमंत्र’, ‘नांदी’ यांसारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटके आणि ‘बालगंधर्व’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘पावनखिंड’ यांसारखे चित्रपट करत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे.