‘टाईमपास’ चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. २७ मार्चला दरवर्षी जागतिक रंगमंच दिवस साजरा केला जातो. याच निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये प्रथमेशने रंगभूमी, नाटकात काम करणारे कलाकार आणि सध्याचं रील्सचं जग यातील फरक सांगितला आहे. तसेच प्रत्येक कलाकार रंगभूमीमुळे घडतो असं देखील त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रथमेश परबने शेअर केलेल्या पोस्टला ‘Reels आणि रंगमंच’ असं कॅप्शन दिलं आहे. कॉलेजमध्ये पार पडणाऱ्या एकांकिका स्पर्धांमुळे आयुष्य कसं बदलतं याविषयी अभिनेत्याने सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

Sunil Barve said Vandana Gupte filled Diesel in his first car Sachin Pilgaonkar also appreciated his work
वंदना गुप्तेंनी भरलं होतं सुनील बर्वेंच्या पहिल्या गाडीतलं पहिलं डिझेल; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा
Rajkumar Rao on plastic surgery viral photo actor did chin fillers
राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये? ‘त्या’ व्हायरल फोटोबद्दल अभिनेता म्हणाला, “मी हनुवटीसाठी…”
Aarya Ambekar appreciate Sankarshan Karhade for his skills in niyam va ati lagoo natak
‘नियम व अटी लागू’ नाटक पाहिल्यानंतर आर्या आंबेकरने केलं संकर्षण कऱ्हाडेचे कौतुक; म्हणाली, “तुझ्या लिखाणाने, अभिनयाने…”
Taapsee pannu first interview after marriage with boyfriend mathias boe
“मला खात्री करून…”, लग्नांतर पहिल्यांदाच तापसी पन्नूने केलेलं विधान चर्चेत

हेही वाचा : प्रवीण तरडेंनी लंडनमध्ये शेक्सपिअरच्या घराला दिली भेट, ‘त्या’ गोष्टीने वेधलं अभिनेत्याचं लक्ष; म्हणाले, “प्रत्येक भारतीयासाठी…”

प्रथमेश लिहितो, “आज २७ मार्च २०२४! जागतिक रंगमंच दिवस… नाटक जगलेल्या आणि नाटकावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताला व त्या कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना मन:पूर्वक शुभेच्छा! आमच्या वेळेस ११ वी ला कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, कलेची आवड असणारा तो किंवा ती, ज्या कॉलेजमध्ये एकांकिका किंवा नाटकाला जास्त महत्त्व मिळेल त्या कॉलेजला प्राधान्य देत असत.”

अभिनेता पुढे लिहितो, “काळ बदलला…माध्यमं बदलली…आणि आजकाल एकांकिकेच्या क्रेझची जागा हळुहळू reels ने replace केली आहे. Reel हे माध्यमही चांगलच आहे म्हणा, त्यातही चांगला content सादर करता येतोच, पण तरीही अभिनयाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रंगमंच जगायला हवा.”

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळेने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, बायकोसह शेअर केला सेल्फी

“अनेक महिन्यांची तालीम, पाठांतर, एकांकिका स्पर्धा आणि त्यानंतर One Take मध्ये सादर केलेलं नाटक, खूप retakes घेऊन शूट केलेल्या Reels पेक्षा जास्त जिवंत वाटतं. वेगवेगळ्या Transition आणि स्लो मोशनपेक्षा फिरता रंगमंच अंगावर जास्त काटा आणतो. रील्सवर आलेल्या कमेंट्स वाचून छान वाटतं पण स्टेजवर लाइव्ह परफॉर्म करताना, आपल्यासाठी वाजणाऱ्या शिट्ट्या आणि टाळ्या यांसारखी दुसरी शाबासकीची थाप नाही.” असं प्रथमेशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अभिनेता शेवटी लिहितो, “अभिनय सादर करायचं कोणतंही माध्यम वाईट नाही. परंतु, अभिनय सादर करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अभिनय ही कला आहे आणि ती सरावानेच आत्मसात करता येते. म्हणूनच बॅकस्टेज, तिसरी घंटा, ब्लॅकआऊट, फंबल, लाइट व रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत या वाक्यातील विलक्षण अनुभव एकदा तरी जगायलाच हवा, तरच रंगमंच जगेल अन् खऱ्या अर्थाने टिकून राहील.”