अभिनेता रितेश देशमुख हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रितेशची प्रमुख भूमिका असलेला वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. रितेश देशमुख हा अभिनेता असला तरी तो महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यात जन्मलेला आहे. रितेश देशमुखचा धाकटा भाऊ आणि काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुखने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात त्याने मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “नोकराच्या भूमिकेचा शिक्का पडला की…” वनिता खरातने सांगितले हिंदी चित्रपटात काम न करण्याचे कारण

“माझा लाडका धीरज देशमुख. आम्ही कायमच तुझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला असू. तुझी ढाल म्हणून… वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा यंदाचा वाढदिवस चांगला जावो. तुम्ही असेच चांगले काम करत राहा आणि पप्पांना तुझा अभिमान वाटेल असंच राहा”, असे त्याने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : “तुझ्याबद्दल विचार कोण करतं?” व्हिडीओदरम्यान जिनिलिया म्हणाली असं काही…; रितेशच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रितेश देशमुख हा अभिनेता असला तरी तो महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यात जन्मलेला आहे. त्याचे वडील दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याबरोबर रितेश देशमुखचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख हे दोघेही राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. पण रितेशने मनोरंजन क्षेत्राची निवड करत यशस्वी करिअर केले आहे.