मराठमोळा रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या बहुचर्चित ‘वेड’ चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चित्रपट कमाईचे नवनवे विक्रम मोडत आहे. ३० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण प्रेक्षक अजूनही चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला गर्दी करताना दिसत आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलीयाच्या मुख्य भूमिका असून तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया यांनी २०१२मध्ये लग्न केलं होतं. महाराष्ट्राची सून असलेली जिनिलीया मराठी खूप छान बोलते. याशिवाय तिला मराठी संस्कृतीची जाणदेखील आहे. तिला मराठी पद्धतीने जेवण बनवताही येतं. जिनिलीयाला महाराष्ट्रीय पदार्थ खायलाही खूप आवडतात. अलीकडेच तिच्या आवडत्या मराठी पदार्थाबद्दल रितेशला विचारण्यात आलं.

“…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

जिनिलीयाला पाणी पुरी व पिठलं भाकरी यातला कोणता पदार्थ खायला आवडतो? असं रितेशला विचारलं असता तो म्हणाला, “जिनिलीयाला पाणीपुरी खायला आवडते पण लातुरला गेल्यावर तिची आवड बदलते. तिथे ती पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, काळ्या मसाल्याची आमटी, भगार हे पदार्थ जास्त आवडीने खाते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, “तू सासूबाईंकडून महाराष्ट्रीय पदार्थ बनवायला शिकलीस का?” असा प्रश्न जिनिलीयाला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खुपच आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी व ठेचा़ बनवतात. मी माझ्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवलं आहे.”