scorecardresearch

Premium

रोहिणी हट्टंगडी यांचा ‘झिम्मा २’च्या ‘मराठी पोरी’ गाण्यावर डान्स, हेमंत ढोमे म्हणाला…

या नाटकातील सर्व कलाकार ‘झिम्मा २’ चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

rohini hattangadi marathi pori song
रोहिणी हट्टंगडी यांचा 'झिम्मा २'च्या 'मराठी पोरी' गाण्यावर डान्स

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा बहुचर्चित चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. गेल्या शुक्रवारी २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटातील गाणीही सुपरहिट होताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्यावर अभिनेत्री पर्ण पेठेने एक रील व्हिडीओ शेअर केला आहे.

पर्ण पेठे ही इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असते. सध्या ती ‘चारचौघी’ या नाटकात व्यस्त आहे. नुकतंच तिने मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर या कलाकारांबरोबर एक रील व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : Video : ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी सेटवर ‘अशी’ केली धमाल, ‘मराठी पोरी’ गाण्याचा पडद्यामागचा व्हिडीओ पाहिलात का?

shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
sonalee-kulkarni
“याची अन् नटरंगची कथा… “, ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटाबद्दल मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीचं मोठं वक्तव्य
viju-mane-marathi-industry
मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”

यात या नाटकातील सर्व कलाकार ‘झिम्मा २’ चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. “चारचौघीच्या मराठी पोरींकडून झिम्मा २ च्या मराठी बाया – काकू — नाही नाही — पोरींना खूपखूप प्रेम!!!”, असे कॅप्शन पर्णने या व्हिडीओला दिले आहे.

चारचौघी नाटकाच्या कलाकारांच्या या रीलवर ‘झिम्मा २’ मधील अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेने या पोस्टवर “खूप खूप प्रेम. रोहिनी मावशी तर झक्कास”, अशी कमेंट त्याने केली आहे. तर निर्मिती सावंत यांनी “खूप खूप प्रेम तुम्हा सगळ्यांना”, असे म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘झिम्मा १’नंतर ‘झिम्मा २’ चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांची मनं, तीन दिवसात कमावले इतके कोटी

‘झिम्मा २’ या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohini hattangadi dance on jhimma 2 marathi pori song hemant dhome commented nrp

First published on: 28-11-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×