मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला. ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा झाली होती, पण चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. परिणामी या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूपच कमी झालं आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनातील संघर्ष ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेच सिनेमाचं शूटिंग झालं आणि रिलीजची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या टीमने राज्यभरात प्रमोशन केलं होतं, मात्र तरी प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे.

“गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलंच पाहिजे”, मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘संघर्षयोद्धा’चा ट्रेलर

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८ लाख रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी ९ लाख, तिसऱ्या दिवशी १६ लाख, चौथ्या दिवशी ९ लाख, पाचव्या दिवशी चार लाख व सहाव्या दिवशी चार लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची सहा दिवसांची एकूण कमाई ५० लाख रुपये झाली आहे.

Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी इथं या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ट्रेनमध्ये पहिली भेट अन् लग्नाचा निर्णय, आजही पतीपासून दूर राहतात अलका याज्ञिक; वाचा हटके लव्ह स्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.