मराठी चित्रपटसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर आता लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : “तुला फक्त पाहायचंय…” कुशल बद्रिकेला येतेय बायकोची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाला…

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे. यामध्ये ते लिहितात, “माझी कलारुपी सेवा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती शंभू राजांच्या चरणी सुद्धा मी अर्पण करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शंभू राजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ ही चित्रकृती तरुणांना नक्कीच प्रेरणा देईल. जय शिवराय..जय शंभुराजे..”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर आता ‘७२ हूरें’ चित्रपटावरून वाद; लवकरच दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार टीझर, निर्माते म्हणाले…

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून अलीकडच्या तरुणाईला छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पराक्रमाची माहिती मिळेल. हा सिनेमा मल्हार पिक्चरची पहिली मराठी कलाकृती असून याचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी, तर निर्मिती सनी रजानी यांनी केली आहे. चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यावर संपूर्ण टीमने लहानसे सेलिब्रेशन केले याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात शंभूराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, परंतु यामध्ये काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करीत “लवकरात लवकर प्रदर्शानाची तारीख आम्हाला कळवा” अशी मागणी केली आहे.