Actress Shweta Menon Faces Legal Trouble : ९० च्या दशकात अभिनेता सलमान खानबरोबर ‘बंधन’ या चित्रपटात काम केलेली लोकप्रिय अभिनेत्री श्वेता मेनन एका कायदेशीर अडचणीत अडकली आहे. अभिनेत्री एका कायदेशीर वादात अडकली असून याप्रकरणी तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

श्वेता मेननवर ‘अश्लीलता’ पसरवल्याचा आरोप करण्यात आला असून याबद्दल तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता मार्टिन यांनी श्वेता मेनन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. आता अश्लीलता प्रतिबंधक कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वेता मेननने चित्रपट आणि जाहिरातींमध्ये अश्लील दृश्यांचा वापर करून आर्थिक फायदा घेतल्याचा आरोप आहे. हा आरोप मार्टिन मेनाचरी नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.

याप्रकरणी श्वेता मेननवर माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम 67 (A) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. तक्रारीनुसार, तिच्या या कृतीमुळे तरुणांवर वाईट परिणाम होत आहे आणि ती समाजात चुकीचा संदेश देत आहे.

श्वेता फक्त दक्षिणेतील अभिनेत्री नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. ‘रथिनिर्वेदम’ आणि ‘साल्ट एन पेपर’ यांसारख्या मल्याळम चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे, तर हिंदीत सलमान खानच्या ‘बंधन’ आणि ‘अशोका’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.तिने एकूण ३० हिंदी चित्रपटात काम केलं असल्याची माहिती आहे. ती शेवटची ‘बादल’ या चित्रपटात झळकली होती.

१९९७ साली आलेल्या ‘इश्क’ चित्रपटात ‘हमको तुमसे प्यार है’ या गाण्यात डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान, श्वेताने तिच्यावर झालेल्या अश्लीलतेच्या आरोपांबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी श्वेता मेनन काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.