हिंदी चित्रपटाच्या जडणघडणीत ‘शोले’ चित्रपटाचे मोठे योगदान आहे. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले होते. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता ‘शोले’ या चित्रपटाच्या याच प्रतिमेला मानवंदना देणारा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा नवा कोरा हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

हेही वाचा- सिद्धार्थ जाधवच्या आगामी ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचं दुसरं मोशन पोस्टर चर्चेत, चाहते म्हणाले, “जबरदस्त भाऊ…”

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

“हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाच्या नावातूनच “शोले” या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होते. शोले चित्रपटाचे थरारक कथानक व त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच शोले चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. ‘शोले’ हा चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. ‘शोले’ चित्रपटाच्या याच आठवणींना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट सलाम करणार आहे.

हेही वाचा- एक ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आणि बदललेल्या चार आयुष्यांची कहाणी! उलगडणार नव्या कोऱ्या नाटकात

या चित्रपटात राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, श्रीरंग महाजन यांची महत्वाची भूमिका आहे. तर आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत झळकणार आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, चित्रपटाच्या नावामुळे प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुक्तता वाढली आहे.