scorecardresearch

Video : “आयुष्यात कधीच कुटुंबियांच्या…” सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, अभिनेत्याचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

siddharth jadhav siddharth jadhav instagram
सिद्धार्थ जाधवचं लग्नाबाबत भाष्य, सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

अभिनेता सिद्धार्थ जाधव आज मराठीमधील टॉपचा अभिनेता आहे. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने काम करण्यास सुरुवात केली. ‘सर्कस’ हा सिद्धार्थचा शेवटचा चित्रपट. सतत आपल्या कामामुळे चर्चेत असणारा सिद्धार्थ सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. तो त्याच्या दोन्ही मुलींबरोबर अनेक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसतो. आताही त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – Video : प्लाझा चित्रपटगृहाबाहेरच झोपायचे सिद्धार्थ जाधवचे वडील, अभिनेत्याला रडू कोसळलं, म्हणाला, “टॉवरमध्ये घर…”

मध्यंतरी सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला होता. पत्नी तृप्तीबरोबर तो घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र दोघांनीही या चर्चांवर मौन पाळणं पसंत केलं. आता सिद्धार्थने लग्नाबाबतच भाष्य करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अगदी मजेशीर आहे.

सिद्धार्थने शेअर केलेल्या रिल व्हिडीओमध्ये त्याच्या दोन मुलीही दिसत आहेत. सिद्धार्थ यामध्ये म्हणतो, “आयुष्यात कधी तीन गोष्टी करू नका. कुटुंबियांच्या मनाप्रमाणे लग्न, आपल्याला हव तंस लग्न आणि लग्न.” अगदी गंभीर चेहरा करत सिद्धार्थने हे म्हटलं आहे. तर त्याच्या दोन्ही मुली हसत आहेत.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

“…आणि लग्न” असं कॅप्शन सिद्धार्थने या व्हिडीओला दिलं आहे. सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे. तर अनेकांनी दादा के जलवे अशा कमेंट केल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या या व्हिडीओला दहा हजारपेक्षा अधिक लाइक मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:06 IST