अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. सोनालीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सोनालीने तिची मुलगी कावेरीसाठी एक स्पेशल पोस्ट केली आहे. आपल्याला कायमच एक मुलगी हवी होती, असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

“मुलगीच हवी होती मला..
एक अशी आयुष्यात दंग होणारी ठकुताई हवीच होती मला..
तिच्या पसाऱ्यात मी मला सापडते..
तिच्या पानाफुलांमधे ती हरवलेली असते..
खूप वेचत असते..
खूप शिकत असते..
खूप जास्त शहाणं करत असते आम्हाला सगळ्यांना
आम्ही खरंच भाग्यवान आहोत, आमच्या घरी ह्या कावेरी नदीचा उगम झालाय..” असं सोनालीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाली कुलकर्णीने २४ मे २०१० रोजी बालाजी टेलिफिल्म्सचे सीईओ नचिकेत पंत-वैद्यशी केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिची मुलगी कावेरीचा जन्म झाला. सोनाली कुलकर्णीने संसार आणि करिअर दोन्ही अगदी उत्तम सांभाळलं. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पती आणि मुलीबरोबर वेळ घालवत असते. त्यांच्याबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.