वेगवेगळे मुखवटे धारण करत, माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग. या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांचं पूजन करून करायचा उत्सव म्हणजे ‘बोहाडा’ होय. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दाक्षिणात्य निर्माते मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत.

राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याबाबत माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, ” निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहीत नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.”

Manjummel Boys movie to release OTT
अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला, पोस्ट शेअर करत म्हणाली, “मी आणि विजयने…”

bohada
बोहाडा चित्रपटाचे पहिले लूक पोस्टर (फोटो – PR)

चित्रपटाबद्दल पुढे ते म्हणाले, “चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगंही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माते पसंती दर्शवत आहेत.”