अभिनेते अजय पुरकर हे मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहेत. नुकतेच ते ‘सुभेदार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटात त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. तर आता हा मराठमोळा अभिनेता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकण्यासाठी सज्ज आहे. नुकतंच त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे.

अजय पुरकर एका तेलुगू चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटातून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाचं नाव आहे ‘स्कंदा’. या चित्रपटाचे दिग्दर्शक बेयापती श्रीनू यांनी केलं आहे. नुकतंच या चित्रपटांच्या ट्रेलर लॉंच दरम्यान बेयापती श्रीनू यांनी चित्रपटातील कलाकारांची ओळख करून दिली. यादरम्यान त्यांनी अजय पुरकर यांचंही तोंडभरून कौतुक केलं.

आणखी वाचा : कंडक्टर म्हणून काम केलेल्या ‘त्या’ बस डेपोला रजनीकांत यांनी दिली भेट; कर्मचाऱ्यांशी मारल्या गप्पा

या कार्यक्रमात बेयापती श्रीनू यांनी अजय पुरकर यांची ओळख मराठी रंगभूमीवरील उत्तम अभिनेता अशी करून दिली. याबरोबरच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटाचं आणि त्यात तान्हाजी मालुसरे यांची भूमिका निभावणाऱ्या अजय पुरकर यांचं खूप कौतुक केलं आहे. शिवाय चित्रपटाच्या टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ नुकताच अजय पुरकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता राम पोथिनेनी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर यात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यात अभिनेते अजय पुरकर यांचीही झलक दिसली. आता त्यांचे चाहते या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत.