आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशी ओळख असलेल्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या २०२२ या वर्षासाठी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यासाठी पोटरा, तिचं शहर होणं, पांडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. लवकरच या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहेत. दरवर्षी गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशन (एफआयएपीएफ) द्वारे इफ्फीला मान्यता आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि भारत आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात.

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवासाठी ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज , एफटीआयआय चे धीरज मेश्राम , युनेस्को चे ज्युरी मनोज कदम , चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता.या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे.

यात पोटरा, तिचं शहर होणं, पांडीचेरी, राख आणि पल्याड या ५ मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These five marathi film selected for goa international film festival nrp
First published on: 15-10-2022 at 10:19 IST