अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत लवकरच ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकानंतर जवळपास १० वर्षांनी दोघेही पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र दिसतील. प्रिया-उमेश गेली १७ ते १८ वर्ष एकमेकांबरोबर आहेत. त्यामुळे मराठी कलाविश्वात त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने उमेशने प्रियाशी लग्न का केले? याबाबत गमतीशीर खुलासा केला आहे.

हेही वाचा : ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने; म्हणाले, “खूप वर्षांनी…”

उमेश ‘मीडिया तर मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “‘दे धमाल’ या मालिकेच्या निमित्ताने मी सगळ्यात आधी प्रियाला पाहिलं होतं. त्या मालिकेच्या टायटल गाण्यात ती गोल फिरून वगैरे जायची ते मला खूप आवडायचं. हा किस्सा मी तिला अनेक वर्ष सांगतोय. त्यानंतर ‘आभाळमाया’ या मालिकेच्या सेटवर आम्ही प्रत्यक्ष भेटलो. संपूर्ण शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी फार बोललो नव्हतो. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आम्ही एकमेकांचे नंबर घेतले होते.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे झळकणार चित्रपटात; ‘ही’ भूमिका साकारणार

उमेश कामत पुढे म्हणाला, “आधी गर्लफ्रेंड, पुढे लग्न ते आतापर्यंत मी प्रियाच्या प्रचंड खोड्या काढतो. मला तिच्या खोड्या काढता याव्यात म्हणून मी तिच्याशी लग्न केलं असं म्हणायला हरकत नाही. अगदी खरं सांगायचं झालं तर, तिच्यासारखी बायको मिळाली तर आणि काय हवं?” तसेच प्रियाने होकार दिल्याने हे नाटक जुळून आले असेही अभिनेत्याने यावेळी सांगितले.

हेही वाचा : लग्न न करता अभिनेत्री झाली आई; ट्रोल झाल्यावर सोडलं मौन, म्हणाली, “मी आधीच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ५ ऑगस्टला ठाण्यात होणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने उमेश-प्रिया यांची जोडी जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.