अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची आई म्हणजेच सीमा चांदेकर यांनी गेल्यावर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं. नितीन म्हसवडे यांच्याशी सिद्धार्थच्या आईने दुसऱ्यांना लग्नगाठ बांधली. पण तरीही सिद्धार्थ सावत्र वडिलांना बाबा अशी हाक मारत नाही. अभिनेता त्यांना काका अशी हाक मारतो. यामागचं कारण नुकतंच सिद्धार्थने एका मुलाखतीमधून स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा त्याला विचारलं की, सावत्र वडिलांना तू अजूनही काका अशी हाक मारतोस. वडिलांची जागा तू त्यांना दिली नाहीस. यामागची नेमकी काय भावना आहे? याच उत्तर देत सिद्धार्थ म्हणाला, “कारण माझ्यासाठी वडील हा विषयचं पूर्णपणे संपला आहे. वडील हा मुद्दाच नाहीये, तो बाजूला ठेवून काका यासाठी मी त्यांना म्हणतो. मी माझ्या सासऱ्यांना देखील काकाचं म्हणतो. त्यांचं पण काही म्हणणं नाही. पण मिताली म्हणते, तू बाबा वगैरे का नाही म्हणतं? मी म्हटलं, मी लहानपणी जे बाबा शेवटचं म्हणून गेलोय तेवढंच. माझ्या आता काही डोक्यातच नाहीये. मी इतर कोणालाही आई म्हणू शकत नाही. म्हणजे ही पण माझ्या आईसारखी आहे, ही पण माझी आई आहे, असं नाही. माझी आई एकच आहे बॉस आणि तेवढीच आहे. तसेच माझे वडील एकच आहेत. ते तेवढेच आहेत आणि ते तेच पूर्णपणे राहणार आहेत. मला दुसऱ्या कोणाला ते नातं नाही द्यावसं वाटतं. कारण मला असं वाटतं की, ते मनापासून होणार नाही.”

हेही वाचा – सिद्धार्थ चांदेकरने आईला दुसऱ्या लग्नासाठी ‘असं’ केलं तयार, अभिनेता म्हणाला, “लोक आपलं…”

“मी कोणालाच ताई म्हणतं नाही. माझ्या चुलत बहिणी आहेत, ज्या माझ्याहून मोठ्या आहेत. पण मी त्यांना ताई नाही म्हणून शकत. कारण माझी ताई एकच आहे; जी माझी सख्खी बहीण आहे, असा तो झोन आहे. त्यामुळे त्यांना हे मी नातं देणार नाही किंवा ही त्यांची जागा नाही. कारण माझ्या वडिलांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. जसं माझ्या आईची जागा काढू शकत नाही, तसंच वडिलांची जागा देखील आहे आणि ती कोणीही अजिबातच भरून काढू ही नये. ते माझ्या आईने केलं आहे. म्हणून मला दुसऱ्या कोणाला बाबा म्हणावस वाटतं नाही. दुसऱ्या कोणाला आई, ताई म्हणावस वाटतं नाही. असा माझा झोन आहे,” असं सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा – शेजारचे मुद्दाम विचारायचे खोचक प्रश्न; सिद्धार्थ चांदेकर ‘तो’ काळ आठवत म्हणाला…

पुढे सिद्धार्थला विचारलं की, कधी वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही? इतका मोठा स्टार झाला आहेस तरीही त्यांनी तुला कधी संपर्क साधला नाही? याविषयी अभिनेता म्हणाला, “नाही. मला त्याची गरज वाटतं नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does siddharth chandekar call his stepfather uncle pps
First published on: 15-03-2024 at 16:33 IST