लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अशा तिहेरी भूमिकेत आपली छाप पाडणारे म्हणून प्रवीण तरडेंना ओळखले जाते. प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. या चित्रपटानंतर आता प्रवीण तरडे हे शेती करण्यात रमल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा शेती करतानाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

प्रवीण तरडे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी त्यावरुन विविध गोष्टींवर त्यांची मत मांडत असतात. नुकतंच प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रवीण तरडे हे शेती करताना दिसत आहेत. एक बैलजोडी घेऊन ते स्वत: शेतात राबताना दिसत आहेत. या व्हिडीओला ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गाणे बॅकग्राऊंडला ऐकायला मिळत आहे.
“मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

प्रवीण तरडे यांनी या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात .. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..”, असे त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे.

प्रवीण तरडेंनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करताना म्हटले की, “आणि हा चिखल राबतानाचा आहे.. फोटो काढण्यासाठीचा नाही हे महत्त्वाचं.” तर प्रवीण तरडेंची एक चाहती या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली, “सर तुमच्या अशा पोस्ट बघून मला खूप अभिमान वाटतो तुमचा. सर मीसुद्धा शेतकऱ्यांची लेक आहे ,आता सासरी शेती नाही ,मी शेजाऱ्यांना मदत करायला जाते,त्यांना खूप आनंद होतो एक अभिनेत्री आपल्या शेतात काम करते म्हणून खूप खुश होतात ,तुम्ही तुमच्या अन्न देणाऱ्या आईशी एकरूप आहात ,सलाम तुम्हाला.” या कमेंटवर प्रवीण तरडेंनीही इमोजी शेअर करत आभार मानले आहेत.

“आता मराठी चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे भव्य दिसतोय…”, प्रसिद्ध गायकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने विक्रमी कलेक्शन केले होते. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली होती. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत होते. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडेंनी साकारली आहे.