लॉकडाउनमध्ये रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा सुरू झाली आणि अनेक वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. ही मालिका आता मराठी भाषेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतरही तसूभरही कमी झालेली नाही. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल. ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर १ जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “इतकी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येतेय याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतले प्रभुराम , सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मायबोली मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi dubbed version of ramanand sagars ramayana to premiere on june 1 ssv
First published on: 26-05-2020 at 10:27 IST