Video : बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या ‘कृतांत’चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे.

कृतांत

मिहीर शाह निर्मित कृतांत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपाटा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. यावेळी अभिनेता संदीप कुलकर्णी यांच्या हटके लूकची बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं असून कथा, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारीही त्यांनीच उचलली आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटात वर्तमान काळातील जैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्वज्ञानाशी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलं आहे.

दरम्यान, या चित्रपटात संदीप कुलकर्णीसोबत सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन हे स्टारकास्ट स्क्रिन शेअर करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi movie krutant teaser launch